Album: Ardhich Ratra Vedi
Singer: Padmaja Phenany-Joglekar
Music: Yashwant Deo
Lyrics: Vinda Karandikar
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 05:31
Downloads: 3629
अर्धीच रात्र वेडी, अर्धी-पुरी शहाणी अर्धीच रात्र वेडी, अर्धी-पुरी
शहाणी भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी अर्धीच रात्र वेडी
फुलले पुन्हा-पुन्हा हा केला गुन्हा जगाचा फुलले पुन्हा-पुन्हा
हा केला गुन्हा जगाचा ना जाहले कुणाची... ना जाहले
कुणाची पत्त्यामधील राणी ही रोजची कहाणी अर्धीच रात्र
वेडी येता भरून आले, जाता सरून गेले येता
भरून आले, जाता सरून गेले नाही हिशेब केले नाही
हिशेब केले, येतील शाप कानी ही रोजची कहाणी
अर्धीच रात्र वेडी आता न सांध्यतारा करणार रे
पहारा आता न सांध्यतारा करणार रे पहारा फुलणार नाही
आता... फुलणार नाही आता श्वासांत गूढ गाणी ही
रोजची कहाणी अर्धीच रात्र वेडी शापू तरी कशाला
या बेगडी जगाला शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी... मी कागदी फुलांनी भरतेच फूलदाणी
ही रोजची कहाणी भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी अर्धीच
रात्र वेडी अर्धीच रात्र वेडी अर्धीच रात्र वेडी