Album: Gela Kuthe
Singer: Swapnil Bandodkar
Music: Milind Vasudev, Mithilesh Patankar
Lyrics: Atul Wagh
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 06:17
Downloads: 835
गेला कुठे सांगा मोहन मुरारी? गेला कुठे सांगा मोहन
मुरारी? छेडून माझ्या हृदयीची बासरी छेडून माझ्या हृदयीची बासरी
जमूना पार मी धाडीला निरोप कुठे हरवला माझा
सखया हरी? कुठे हरवला माझा सखया हरी? गेला कुठे
सांगा मोहन मुरारी? चंद्र, तारे आसमंती सर्व जागणारे
चंद्र, तारे आसमंती सर्व जागणारे आयुष्य विखुरले त्यावर सारे
मिटली नाही माझ्या नयनीची पापनी वाटेवर तुझ्या नजरेची
पाखरे जमूना पार मी धाडीला निरोप कुठे हरवला माझा
सखया हरी? कुठे हरवला माझा सखया हरी? सूर
बासरीचा जवळी आला सूर बासरीचा जवळी आला गोकुळीचा कान्हा
मजवर प्रसन्न झाला अगाध प्रीतीच्या मिलन समयी धरणीवरती
रंगांचे आभाळ दाटले अंतरी सदा तुझेच रूप वसते
अंतरी सदा तुझेच रूप वसते तुझाच जप, तुझेच तप
तुझाच जप, तुझेच तप तूच नृप, तू स्वरूप तूच
नृप, तू स्वरूप भक्तीरसाची ओंजळ वाहते मनमंदिरी चरणी
तुझिया आले, माझ्या श्याम मुरारी चरणी तुझिया आले, माझ्या
श्याम मुरारी चरणी तुझिया आले, माझ्या श्याम मुरारी