DJJohal.Com

Manas Pooja by Bharat Balavalli
download Bharat Balavalli  Manas Pooja mp3 Single Tracks song

Album: Manas Pooja

Singer: Bharat Balavalli

Music: Bharat Balavalli

Label: Universal Music India .

Released: 2012-01-01

Duration: 07:28

Downloads: 287802

Get This Song Get This Song
song Download in 320 kbps
Share On

Manas Pooja Song Lyrics

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति
रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय
नमो नमस्ते || हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा ||
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय
माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो
जीव तैसा || १ || स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी
|| हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग
साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २
|| महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी
पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ ||
परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ || सुवर्ण ताटी
महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती || शुभारंभ
ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला ||
४ || हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी
पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणिपात साष्टांग शरणागताचा
|| तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा
|| दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला
|| ६ || वीणा तुतार्या किती वाजताती || शंखादि
वाद्ये पहा गर्जताती ।। म्हणती नगारे गुरूदेव दत्त ||
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।।
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा
या || ८ || मीं धन्य झालो हे तीर्थ
घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।। अजानबाहू
भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज
|| ९ || प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया
रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला ||
शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० || वक्षस्थळी
लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते
|| ११ || गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया
जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई
|| म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ || इथें
लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली
|| १३ || करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं
जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी
दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ || हृदमंदिराची ही स्नेह
ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती
आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५
|| पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा
वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही ||
मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ || हे
स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही
खव्याची || १७ || डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा
|| हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात
केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें ||
१८ || तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा
करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय ||
हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी
तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी
|| कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू
दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे
तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे ||
२१ || तुझें बाळ पाही तुझी वाट देवा ||
नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे
दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव वसो
माझीया अन्तरी स्वामी देव वसो माझीया अन्तरी स्वामी देव
|| २२ ||

Related Songs

» Omkar Swarupa (Suresh Wadkar) » Ashakya Hi Shakya Kartil Swami (Sadhana Sargam) » Maai Bappa Vithala (Ajay Gogavale, Atul Gogavale) » Sur Niragas Ho (Shankar Mahadevan, Anandi Joshi) » Swami Samarth Jaap (Ketan Patwardhan) » Swami Samarth Song Sadguru Natha Hath Jodito (Mandar Apte) » Gajanan Sukh Karta Dukh Harta (Divya Kumar, Ravi Singhal, Rashmeet Kaur, Anirban Saha, Rohit Shashtri, Akshay Kamat) » Sukhkarta Dukhaharta (Lata Mangeshkar) » Dattabavani (Arun Ingle) » Shri Guru Audumbari Pahile Narhari Audumbari (Kavita Paudwal)