Album: Prem Swarup Aai
Singer: Lata Mangeshkar
Music: Vasant Prabhu
Lyrics: Madhav Julian
Label: Saregama
Released: 2017-12-26
Duration: 03:26
Downloads: 15090
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई! बोलावु तूज आता मी कोणत्या
उपायी? नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तूझी
उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच
रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई, पाहूनिया दुज्यांचे
वात्सल्य लोचनांही. वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे, नेत्री तुझ्या
हसावे, चित्ती तुझ्या ठसावे! वक्षी तुझ्या परि हे
केव्हा स्थिरेल डोके, देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके? घे
जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी, खोटी ठरो न
देवा, ही एक आस मोठी!