Album: Raktamadhe Odh
Singer: Padmaja Phenany-Joglekar
Music: Girish Joshi
Lyrics: Indira Sant
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 06:52
Downloads: 803
रक्ता मध्ये ओढ मातिची रक्ता मध्ये ओढ मातिची रक्ता
मध्ये ओढ मातिची मनास मातीचे ताजेपण मातीतुन मी
आले वरती मातीचे मम अधुरे जीवन मातीचे मम अधुरे
जीवन कोसळतांना वर्षा अविरत कोसळतांना वर्षा अविरत स्नान
समाधी मधे डुबावे कोसळतांना वर्षा अविरत स्नान समाधी
मधे डुबावे दवात भिजल्या प्राजक्तापरी दवात भिजल्या प्राजक्तापरी ओल्या
शरदामधि निथळावे मातीतुन मी आले वरती मातीचे मम
अधुरे जीवन मातीचे मम अधुरे जीवन हेमंताचा ओढुन
शेला हळूच ओले अंग टिपावे हेमंताचा ओढुन शेला हळूच
ओले अंग टिपावे वसंता तले फुला फुलांचे वसंता
तले फुला फुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे मातीतुन
मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन मातीचे मम
अधुरे जीवन ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर जर्द विजेचा
मत्त केवडा जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर
मातीतुन मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन
मातीचे मम अधुरे जीवन आणिक तुझिया, आणिक तुझिया
लाख स्मृतींचे खेळवीत पदरांत काजवे खेळवीत पदरांत काजवे उभे
राहुनी असे अधांतरि उभे राहुनी असे अधांतरि तुजला
ध्यावे, तुजला ध्यावे तुजला ध्यावे, तुजला ध्यावे मातीतुन
मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन मातीचे मम
अधुरे जीवन