Album: Shrirama Ghanshyama
Music: Lata Mangeshkar, Vasant Prabhu
Lyrics: P. Savalaram
Label: Saregama
Released: 2012-02-26
Duration: 03:12
Downloads: 31011
श्रीरामा, घनश्यामा बघशील कधी तू रे? तुझी लवांकुश बाळे
रामा, तुझी लवांकुश बाळे श्रीरामा, घनश्यामा वनवासाच्या घरात
माझ्या अरुण-चंद्र हे सवे जन्मता विरह प्रीतिचे दु:खही माझे
हसले रघुनाथा विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी
सीता तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले रामा, गालबोट लागले
श्रीरामा, घनश्यामा रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती
बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ती पूर्ण
पाहिले तुला राघवा परि ही दैवगती तुझे बालपण तुझ्यापरी
का? वनवासी झाले रामा, वनवासी झाले श्रीरामा, घनश्यामा
बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी चार करांचा
कोमल विळखा पडू दे शामलकंठी ताटातुटीच्या भेटी घडता
झरझर अमृत ओठी मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले
माझे रामायण संपले श्रीरामा, घनश्यामा