Album: Swapnatalya Kalyano
Singer: Asha Bhosle
Music: Anil-Arun
Lyrics: M. P. Bhave
Label: Saregama
Released: 2016-02-11
Duration: 02:40
Downloads: 13160
स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड
जीवा रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरुन
गेल्या कधी सोशिला उन्हाळा, कधी लाभला विसावा नैराश्य कृष्णमेघी,
आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजुनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा सिद्धीस कार्य जाता,
येते सुखास जडता जडतेत चेतनेला उरतो न कोणी त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा