Album: Tirtha Vithal Kshetra Vithal
Singer: Pt. Bhimsen Joshi
Music: Ram Pathak
Lyrics: Sant Namdev
Label: Saregama
Released: 2017-11-07
Duration: 06:06
Downloads: 198403
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
॥१॥ माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल
गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा ह्मणे मज
विठ्ठल सांपडला । ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥