Album: Vithal Geetin Gava
Singer: Pt. Bhimsen Joshi
Music: Shrinivas Khale
Lyrics: Sant Tukaram
Label: Saregama
Released: 2000-12-01
Duration: 07:11
Downloads: 253943
विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा
पहावा विटेवरी ॥१॥ अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥ तो चि शरणांगतां विठ्ठल
मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥ विठ्ठल गुणनिधि
विठ्ठल सर्वसिद्धि । लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख । गोडावलें मुख तुका
म्हणे ॥५॥