Album: Jan Palbhar Mhanatil Haay Haay
Singer: Lata Mangeshkar
Music: Vasant Prabhu
Lyrics: B.R. Tambe
Label: Saregama
Released: 2017-12-26
Duration: 03:27
Downloads: 16262
जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!' मी जाता राहिल कार्य
काय? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल; तारे अपुला क्रम
आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल, होईल काहि का अंतराय?
मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी की न उमटतिल, पुन्हा तटावर हेच पाय?
सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा आपुल्या कामिं लागतिल उठतिल,
बसतिल, हसुनि खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय?
अशा जगास्तव काय कुढावे! मोहिं कुणाच्या का गुंतावे? हरिदूता
का विन्मुख व्हावे? का जिरवु नये शांतीत काय?