Album: Kaahi Bolayache Aahe
Singer: Shridhar Phadke
Music: Yashwant Dev
Lyrics: Kusumagraj
Label: Ishtar Music Pvt. Ltd.
Released:
Duration: 06:45
Downloads: 16896
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये भक्ती
तोलणार नाही माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही नक्षत्रांच्या गावातले
मला गवसले गुज परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला त्याचे रहस्य
कोणाला कधी कळणार नाही दूर बंदरात उभे एक
गलबत रुपेरी त्याचा कोष किनार्यास कधी लाभणार नाही
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी त्याच्या निखार्यात कधी तुला
जाळणार नाही