Album: Sheetijachya Par
Singer: Shailesh Ranade
Music: Vivek Paranjape
Lyrics: Sandeep Khare
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 04:03
Downloads: 16634
क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात
थरथरते कुणी जाई दूर तशी मनी हूर-हूर रात ओलावत
सूर वात मालवते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे
वेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते कुणी जाई दूर तशी
मनी हूर-हूर रात ओलावत सूर वात मालवते आता
बोलायाला कोण? संगे चालायाला कोण? कोण टाकेल जीवाचे ओवाळून
लिंबलोण? आता बोलायाला कोण? संगे चालायाला कोण? कोण टाकेल
जीवाचे ओवाळून लिंबलोण? पायरीला ठसेदार खुले छत पिसे
कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते? पायरीला ठसेदार खुले
छत पिसे कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते?
क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात
थरथरते आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातांनी आणि
आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी आता विझवेल दिवा सांज
कापऱ्या हातांनी आणि आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी
पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे पुन्हा पुसतील पाणी हात
थरथरते पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे पुन्हा पुसतील पाणी
हात थरथरते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या
संध्येच्या अंगणी रात थरथरते मनी जागा एक जोगी
त्याचे आभाळ फाटके त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके
मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके त्याचा दिशांचा
पिंजरा त्याच्या झोळीत चटके भिजलेली माती त्याचे हललेले
मूळ त्याचे क्षितिजाचे कुळ त्या चालवते भिजलेली माती त्याचे
हललेले मूळ त्याचे क्षितिजाचे कुळ त्या चालवते क्षितिजाच्या
पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते
सांज अबोला-अबोला, सांज कल्लोळ-कल्लोळ सांज जोगीण विरागी, सांज
साजीरी वेल्हाळ सांज अबोला-अबोला, सांज कल्लोळ-कल्लोळ सांज जोगीण विरागी,
सांज साजीरी वेल्हाळ सांजेवर फूल गंध मौनाचा हवेत
दूर लागले गावात दीप फरफरते सांजेवर फूल गंध मौनाचा
हवेत दूर लागले गावात दीप फरफरते क्षितिजाच्या पार
वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते कुणी
जाई दूर तशी मनी हूर-हूर रात ओलावत सूर वात
मालवते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या
अंगणी रात थरथरते